You are currently viewing ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारांच्या संधी प्राप्त करुन देण्यासठी मंगळवार दि. 22 ते 25 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.

जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करण्यात यावी. जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरिल संकेतस्थळावर स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पत्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी 02362-228835 किंवा 9403350689 येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + eleven =