You are currently viewing वेंगुर्ले एस् .टी.डेपोत लवकरच भाजपा ची कामगार संघटना स्थापन होणार

वेंगुर्ले एस् .टी.डेपोत लवकरच भाजपा ची कामगार संघटना स्थापन होणार

वेंगुर्ले एस्. टी. डेपोतील चालक – वाहक यांनी भाजपा कार्यालयात भेट देऊन केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा

वेंगुर्ले :

एस्. टी. कर्मचाऱ्यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवीण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच भाजपाची कामगार संघटना वेंगुर्ले डेपोमध्ये स्थापन करावी यासाठी वेंगुर्ले डेपोतील चालक व वाहक यांनी भाजपा कार्यालयात भेट घेऊन मागणी केली.

एस्. टी.कामगारांच्या राज्यव्यापी संपकाळात भाजपा च्या वतीने आम. गोपीचंद पडळकर व आम. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलन करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला, त्यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये भाजप पक्षाकडून अपेक्षा निर्माण झाली असल्याने सर्व कामगार भाजपाच्या झेंड्याखाली काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगीतले.

यावेळी भाजपा कार्यालयात जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, सरपंच संघटनेचे प पु परब तसेच एस्.टी.कर्मचारी भरत सिताराम चव्हाण, दाजी तळवणेकर, महादेव भगत, मनोहर वालावलकर, मिलिंद मयेकर, सखाराम सावळ, तेजस जोशी, प्रशांत गावडे, रोशन तेंडोलकर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − ten =