रिक्षा व्यावसायिक नितीन देसाई यांना मातृशोक..
मालवण :
मालवण दांडी येथील रहिवासी श्रीमती रुक्मिणी पंढरीनाथ देसाई वय ८९ हिचे सोमवारी पहाटे मालवण येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तिच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार असून मालवण फोकांडा पिंपळ रिक्षा स्टॅन्ड येथील जुने रिक्षा व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन देसाई तसेच तुषार देसाई यांची ती आई आणि युवा कार्यकर्ते कौस्तुभ देसाई, चिन्मय देसाई, कौशिक देसाई यांची ती आजी होती.