You are currently viewing गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर खड्डेमुक्त झाला असरोंडी ते कणकवली रस्ता

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर खड्डेमुक्त झाला असरोंडी ते कणकवली रस्ता

गणेश चतुर्थी सण तोंडावर येऊन ठेपला असून जागोजागी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे चाकरमानी आणि गणेश भक्तांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन भाजप नेते,माजी सभापती सुनील घाडीगावकर आणि असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांच्या पुढाकारातून असरोंडी मुख्य रस्ता ते कसरल सातरल कणकवली मार्गे खड्डे मुक्त झाला आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गावात येणाऱ्या चाकरमानी, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुनील घाडीगावकर व मकरंद राणे यांच्या प्रयत्नातून या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. यावेळी बूथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत, रघुनाथ सावंत, बेटा गावडे, प्रदीप सावंत, राघू गावकर, सुनिल असरोंडकर यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा