पोर्टेबिलीटी योजनेतंर्गत धान्याची उचल…

सिंधुदुर्गनगरी

एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेतंर्गत राज्य पोर्टेबिलीटी योजना शासनस्तरावरुन कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत लाभार्थी जवळच्या राज्यामधून धान्याची उचल करु शकतो. तसचे या योजनेतंर्गत ई-पास मशीनद्वारे लाभार्थ्यांचे अंगठ्याचे आधार प्रमाणित करुन त्यांना देय असलेल्या धान्याच्या परिमाणानुसार धान्य वितरण करण्यात येते, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

            शासनाने आंतरराज्य पोर्टेबिलीटी व राज्यांतर्गत पोर्टेबिलीटी या दोन्हींबाबत प्राधान्यक्रम दिले आहे. याबाबतची जनजागृती पोस्टर्स, पॅम्प्लेट, होर्डिंग्ज व इतर प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत रविवार दि. 12 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधितांनी यांचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =