You are currently viewing फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत महिला..

फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत महिला..

 

IFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, फाल्गुनी नायर ही सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनली आहे. निक्का या सौंदर्य प्रसाधने निर्माण करणाऱ्या कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनण्याचा मान मिळविला आहे. त्यांनी किरण मुजुमदार या उद्योजक महिलेला मार्गे टाकून हे स्थान पटकाविले अशी माहिती आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच सूचीनुसार देण्यात आली.

निक्का हा सौंदर्य आणि आरोग्य सर्वधन व्यवसायातील एक मंच आहे. हा व्यवसायिक म्हणजे फाल्गुनी नायर ने स्थापन केला. आता या व्यवसायाची नोंद शेअरबाजारात झालेली असून नायर आणि त्यांचे कुटुंब यांची एकंदर संपत्ती ३० हजार कोटी रुपयाच्या वर पोहचली आहे. तसेच एकत्रित मालमत्ता ३८,७०० कोटी रुपयांची आहे. निक्का मंच स्थापन केल्यापासून त्यांच्या एकत्रित संपत्ती 345 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा