You are currently viewing कणकवली 4 डिसेंबर रोजी किलबिल जल्लोष

कणकवली 4 डिसेंबर रोजी किलबिल जल्लोष

कार्यक्रमाची नव्याने रूपरेषा जाहीर, समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली :

बालदिनाचे औचित्य साधत येत्या 20 नोव्हेंबर रोजी आयोजित कलेला किलबिल जल्लोष कार्यक्रम नगराध्यक्ष यांच्या मातोश्री यांचे निधन झाल्याने रद्द केल्यानंतर आता या कार्यक्रमाची नव्याने रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. कणकवली चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे एक लहान मुलांसाठी एक दिवस किलबिल जल्लोष खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 4 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता किलबिल जल्लोष खाऊ गल्लीचे उदघाटन होणार आहे . 5 ते रात्री 10 पर्यत हा कार्यक्रम सूरु राहणार आहे. पुणे येथील गायक सौरभ दफ्तरदार यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे . लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी , थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी जादूगार सुचित्रा इंदुलकर यांचे जादूचे खेळ हे खास आकर्षण असणार आहे. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना सरप्राईज गिफ्ट मोफत देण्यात येणार आहे . तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य सभापती संजय कामतेकर , नगरसेवक अभिजीत मुसळे , मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, महेश सावंत, बंडू गांगण आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − two =