खारेपाटण चेकपोस्टवर चाकरमान्यांच्या रांगा…

खारेपाटण चेकपोस्टवर चाकरमान्यांच्या रांगा…

प्रत्येकाची होतेय आरोग्य तपासणी

कणकवली

खारेपाटण चेकपोस्टवर चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. बाहेरुन आलेल्या नागरिकांची जिल्ह्यात आल्यावर खारेपाटण चेक नाका येथे टेंपरेचर आणि ऑक्सिजन लेवल तपासली जात आहे. त्यामुळे खारेपाटण चेक पोस्टवर पहाटेपासूनच चाकरमान्यांच्या तपासणीसाठी रांगा लागल्या होत्या.
खारेपाटण येथे पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, प्रत्येकी एक कर्मचारी कार्यरत असून या ठिकाणी आलेल्या चाकरमान्यांच्या तपासणी केली जात आहे. तसेच आलेल्यांच्या नोंदी ठेवून कुठल्या गावातील कोण चाकरमानी नोंद ठेवली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा