बारावी परीक्षेत कोकण पुन्हा अव्वल, निकाल ९६.९४ टक्के…
कणकवली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात पुन्हा एकदा कोकण विभाग गुणवत्तेत अव्वल ठरले असून कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के एवढा लागला आहे.
राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळामध्ये बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. तर कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वल ठरले असून ९६.९४ टक्के एवढा निकाल लागला आहे. राज्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान बारावी परीक्षा घेण्यात आली होती. आज दुपारी अकरा वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल जाहीर केला.नऊ विभागीय मंडळ पुणे ९१.३२, नागपूर ९०.५२, छत्रपती संभाजीनगर ९२.२४, मुंबई ९२.९३, कोल्हापूर ९३.६४, अमरावती ९१.४३, नाशिक ९१.३१, लातूर ८९.४६, कोकण ९६.७४.