You are currently viewing भोगवे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश गावडे बिनविरोध…

भोगवे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश गावडे बिनविरोध…

भोगवे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश गावडे बिनविरोध…

वेंगुर्ले

भोगवे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रमेश सावळाराम गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भोगवे ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच किल्लेनिवती शाळा येथे संपन्न झाली. यावेळी सरपंच अंकिता वायंगणकर, उपसरपंच रुपेश मुंडये, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सामंत, सखाराम केसरकर, मनाली गायकवाड, दिगंबर केसरकर, यांसह चेअरमन आदीनारायण सोसायटी चेतन सामंत, रविंद्र कासवकर रामकृष्ण पाटकर, प्रतिक्षा मुंडये, अनिल सामंत, तुषार सामंत, आरोग्य सेवक सूर्यकांत मठकर, आरोग्य सेविका एस. एस. आरोलकर, कोतवाल चंद्रकांत गोसावी यांसबरोबर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक मंगेश नाईक यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामसभेच्या विषयानुसार चर्चा करण्यात आली. तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली याबद्दल रमेश गावडे यांचे सर्वांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + eight =