महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस शेतकरी दिन साजरा

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस शेतकरी दिन साजरा

तालुक्यातील ५८ शेतकऱ्यांना ५८ काजू रोप वाटप

देवगड
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस शेतकरी दिन साजरा करीत असताना जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस,युवक काँग्रेसचे वतीने देवगड तालुक्यातील ५८ शेतकऱ्यांना ५८ काजू रोप वाटप,करण्यात आली .
तसेच कोरोना संक्रमण काळात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन अनेक ग्रामीण भागातील रुग्ण कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत .त्यांना पूरक असे खाद्य म्हणून देवगड तालुका,राष्ट्रीय काँग्रेस,व युवक काँग्रेस यांच्या वतीने उकडलेली अंडी वाटप करण्यात आली.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी यांनी देवगड पोलीस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक एफ.बी.मेंगडे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व पर्यावरण दिनानिमित काजूरोप भेट देऊन त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी जिल्हा युवक काँगेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर,देवगड तालुका काँग्रेस अध्यक्ष उल्हास मणचेकर,युवक काँगेस तालुका अध्यक्ष ,सूरज घाडी, सेवादल अध्यक्ष रवि खाजणवाडकर, महेश नेसवणकर, निलेश ढोके उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा