You are currently viewing ग्रामस्थांच्या तपासण्या वाढविण्याबरोबरच अत्यावश्यक सुविधा द्या…

ग्रामस्थांच्या तपासण्या वाढविण्याबरोबरच अत्यावश्यक सुविधा द्या…

हरी खोबरेकर यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना ; चौके आरोग्य केंद्रात घेतला आढावा…

मालवण

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत आढावा घेतला. कोव्हीडच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांच्या तपासणी वाढविण्याबरोबर आवश्यक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रास कोव्हीशिल्ड लस उपलब्ध असून जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार लस लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून दिली जाईल असे श्री. खोबरेकर यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट आली असून ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत आरोग्यविषयक आढावा घेत वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना केल्या. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, दीपक देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव पोळ, राजेंद्र रणसिंग आदी उपस्थित होते.
यावेळी चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत क्षेत्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळून आले याची माहिती घेण्यात आली. रुग्णांच्या जास्तीत जास्त तपासण्या करण्याबरोबरच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना श्री. खोबरेकर यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 9 =