You are currently viewing पुणे जिल्ह्यामध्ये होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी

पुणे जिल्ह्यामध्ये होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी

पुणे

पुणे जिल्ह्यामध्ये होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

पुणे जिल्ह्या मध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशानाकडून काही पावल उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण साजरे करायला बंदी घालण्यात आली आहे.

आज याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत.या

आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी होळी धुळवड रंगपंचमी साजरी करायला बंदी घालण्यात आली आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा, हॉटेल ,खाजगी तसेच सार्वजनिक मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी होळी तसेच रंगपंचमी साजरी करता येणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + four =