You are currently viewing “लोकसाहित्य हा संस्कृतीचा मोठा ठेवा!” – डॉ. दिलीप गरुड

“लोकसाहित्य हा संस्कृतीचा मोठा ठेवा!” – डॉ. दिलीप गरुड

*”लोकसाहित्य हा संस्कृतीचा मोठा ठेवा!” – डॉ. दिलीप गरुड*

पिंपरी

“लोकसाहित्य हा संस्कृतीचा मोठा ठेवा आहे.तो जतन गरजेचे आहे. असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड यांनी हॉटेल सुरुची सभागृह, नवी सांगवी येथे शनिवार, दिनांक ०६ जानेवारी २०२४ रोजी व्यक्त केले.
धनश्री चौगुले लिखित ‘मौखिक परंपरेतील भाषिक सौंदर्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. दिलीप गरुड बोलत होते. ज्येष्ठ योगाभ्यासक जयवंत पाटील, मौखिक साहित्याच्या ज्येष्ठ संकलक सुधाताई पाटील, मुख्याध्यापक सदानंद पाटील, उद्योजक शिवानंद पाटील, साहित्यिक श्रीकांत चौगुले, लेखिका धनश्री चौगुले यांची व्यासपीठावर तसेच साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

डॉ. दिलीप गरुड पुढे म्हणाले की, “एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने आलेल्या वाड्.मयाला लोकसाहित्य म्हटले जाते. धनश्री चौगुले यांनी ओव्या, पारंपरिक गीते, उखाणे, हुमान (कूटप्रश्न) अशा साहित्यप्रकारांचे परिश्रमपूर्वक संकलन केले आहे. वाड्.मयीनदृष्ट्या हे संकलन अमूल्य आहे!” सदानंद पाटील आणि शिवानंद पाटील यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केलीत. यावेळी सुधाताई पाटील यांनी विविध रंगतदार उखाणे व लोकगीते सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. धनश्री चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “मौखिक साहित्याचा खूप मोठा ठेवा माझ्या आजीकडून आईला मिळाला होता. हे संचित लिखित स्वरूपात पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून लोकसाहित्याचे सुलभ अर्थासह पुस्तकाच्या माध्यमातून संकलन केले आहे. अशी माहिती देताना स्त्री जाणिवांच्या काही हृद्य ओव्यांचे सादरीकरण करून श्रोत्यांना सद्गदित केले.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जयवंत पाटील यांचा सहस्त्रचंद्रदर्शन आणि सुधाताई पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. जयवंत पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. माधुरी लवटे यांनी शुभेच्छापर गीतगायन केले. प्रा. प्राजक्ता चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा पाटील यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा