You are currently viewing दुसरी कसोटी रोमांचक परिस्थितीत, इंग्लंडच्या ‘बैजबॉल’ आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार

दुसरी कसोटी रोमांचक परिस्थितीत, इंग्लंडच्या ‘बैजबॉल’ आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार

*दुसरी कसोटी रोमांचक परिस्थितीत, इंग्लंडच्या ‘बैजबॉल’ आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रोमांचकारी स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दुसऱ्या डावात इंग्लंडने एक गडी गमावून ६७ धावा केल्या आहेत. इंग्लिश संघाला विजयासाठी अद्याप ३३२ धावांची गरज आहे. भारताने ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचवेळी भारतीय संघाला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडची आक्रमक शैली, ज्याला ‘बैजबॉल’ असेही म्हणतात आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडे १४३ धावांची आघाडी होती. ‍भारताने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि एकूण ३९८ धावा झाल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने एका विकेटवर ६७ धावा केल्या आहेत. इंग्लंडला दुसऱ्या डावात एकमेव धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, तो अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद झाला. त्याला २८ धावा करता आल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जॅक क्रॉली २९ धावा आणि रेहान अहमद नऊ धावांसह खेळत होते.

चौथ्या दिवसाचे पहिले सत्र महत्त्वाचे ठरू शकते. सुरुवातीच्या षटकांत जसप्रीत बुमराहही टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननेही कहर केला. तिसऱ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता २८ धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली. अँडरसनने झटपट दोन धावा देत दोन बळी घेतले. त्याने आधी कर्णधार रोहित शर्मा आणि नंतर यशस्वी जैस्वालला तंबूमध्ये पाठवले. रोहितला १३ तर यशस्वीला १७ धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही २९ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार नऊ धावा करून बाद झाला. त्याचवेळी शुभमनने अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. शुभमनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. अक्षर ४५ धावा करून बाद झाला. भरत सहा धावा करून बाद झाला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. अश्विनने अखेरीस २९ धावांची समंजस खेळी केली. अशा प्रकारे भारताने दुसऱ्या डावात ३९८ धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले. तर रेहान अहमदला तीन आणि जेम्स अँडरसनला दोन विकेट मिळाल्या. शोएब बशीरने एक विकेट घेतली.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा