You are currently viewing निगुडे ग्रामसेविका तन्वी गवस आदर्श ग्रामसेविका पुरस्काराने सन्मानित

निगुडे ग्रामसेविका तन्वी गवस आदर्श ग्रामसेविका पुरस्काराने सन्मानित

बांदा

प्रशासकीय सेवेत असताना बदली हा कर्मचाऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण आणि त्या अनुषंगाने होणारा कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा हा भावनिक प्रसंग निगुडे गावात कार्यरत असलेल्या ग्रामसेविका तन्वी गवस यांची ८ वर्षाच्या सेवेनंतर प्रशासकीय बदली झाली. त्यानिमित्ताने निगुडे गावातील आजी-माजी सरपंच -उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी व महिला यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता.

यावेळी गेल्या आठ वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना आदर्श ग्रामसेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निगुडे गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर व व्यासपीठावर सत्कारमूर्ती तन्वी गवस यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच समीर गावडे यांनी उपस्थित सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना तन्वी गवस यांच्या कार्याचा गौरव केला. शेर्ले गावचे माजी सरपंच उदय धुरी त्यांच्याविषयी बोलताना ही व्यक्ती म्हणजे माणसातील साक्षात देवी आहे, असा उल्लेख करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी ग्रामपंचायत सदस्य विठू गवंडे त्यांचा गौरव करताना म्हणाले की, निगुडे गावाप्रमाणे अन्य ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उभारी येवो. माजी सरपंच आत्माराम गावडे यांनी त्यांचे सामाजिक बांधिलकी ऋणानुबंध यांचा आवर्जून उल्लेख केला. सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव यांनी त्यांच्या प्रशासकीय काम खरोखर कौतुकास्पद आहे. तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे अगदी लहानथोरांना घेऊन सांभाळून काम करणारी व्यक्ती म्हणजे आमची ग्रामसेविका असा उल्लेख त्यांनी केला. तर माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे यांनी प्रशासनात मला सांभाळून घेणारी माझी मोठी बहीण या शब्दात त्यांचा गौरव केला. खरोखर गेल्या पाच वर्षात प्रशासकीय कामात सुट्टी न घेता खरोखर गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय असं काम केलं. तसेच निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनीही सरपंच आणि ग्रामसेवक हे ग्रामपंचायतचे महत्त्वाचे दावेदार आहेत. त्यामुळे त्यांनी खरोखर चांगले काम या गावासाठी केले. तसेच रोणापाल गावचे सरपंच योगिता केणी या म्हणाल्या की, माझ्या जास्त परिचयाच्या नाहीत, परंतु एक दिवस माझ्या ग्रामपंचायतीचा कार्यभार त्यांच्याजवळ होता. परंतु त्यांच्या कामाच्या शैलीने मी एका दिवसातच प्रभावित झाले. हसरा चेहरा असा त्यांचा उल्लेख केला. माजी उपसरपंच गुरुदास गवंडे म्हणाले कि, सन २०१७ ते सन २०२२ या पाच वर्षांमध्ये विकास काम करत असताना या विकासामध्ये लागणारे प्रशासकीय कागदपत्रे वेळेत सादर केली. आणि खरोखर गाव विकासाच्या वाटेकडे जात असताना गवस मॅडम यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी होते. यावेळी माजी निगुडे मुख्याध्यापक महादेव नाईक, तलाठी भाग्यश्रीला शिंदे, तसेच रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सौ. गवस यांच्या बद्दल गौरवउद्गार काढले. सत्कारमूर्ती तन्वी गवस बोलताना म्हणाल्या की निगुडे आजी -माजी सन्माननीय सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सर्व लहान थोर प्रेमळ ग्रामस्थ, महिला भगिनी व गावातील अन्य क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने मी निगुडे गावात ग्रामसेवक या पदावर यशस्वीपणे कार्य करू शकले. आपण सर्वांची आपुलकी आणि पाऊलगणिक मिळणारी प्रेरणा तसेच लाखमोलाचे आशीर्वाद सदैव अंतरात जपेन हा ऋणानुबंध निरंतर असाच राहो. निगुडे गावाच्या वतीने माझ्या सत्काराचे आयोजन केले. त्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार. माझी बदली सोनुर्ली गावी झाली तरी निगुडे गावावर असणारे प्रेम कधीही कमी होणार नाही. यावेळी उपस्थित सर्व अबाल वृद्धांनी या कार्यतत्पर, मनमिळावू, हसमुख व्यक्तिमत्वाला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व निरोप देताना लोकप्रतिनिधी सह अनेक जणांना अश्रू आवरता आले नाही. आणि सर्वांनी सांगितलं की मॅडम आम्ही आणि आमचं गाव नेहमी आपल्या पाठीशी सदैव राहील. तसेच यावेळी निगुडे गावातील गौरव प्राप्त दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.मडुरा हायस्कूल मध्ये निगुडे गावातून द्वितीय क्रमांक आलेली कु. विनिता सोमा नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती तन्वी गवस यांचाही गावच्या वतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन उचित सन्मान करण्यात आला. तर गुरुदास गवंडे यांनी आभार मानले. तर तन्वी गवस यांच्यावतीने त्यांचे यजमान तानेश्वर गवस यांनी आयोजकांचे उपस्थितांचे आभार मानले. यावेळी निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, उपसरपंच गौतम जाधव, रोणापाल सरपंच योगिता केणी, निगुडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, शेलेॆ माजी सरपंच उदय धुरी, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, आप्पा गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, लक्ष्मी दळवी, वर्षा जाधव, विठू गवंडे वसंत जाधव, प्रकाश तुळसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा पोखरे, नारायण राणे, बाबली तुळसकर लवु नाईक, सुरेश रुबजी, गंधाली निगुडकर, पोर्णिमा गावडे, लक्ष्मी नाईक, फुलोमन फना्डीस, दक्षता गावडे, किशोर जाधव ,सोमा नाईक, नंदकिशोर निगुडकर, संजना गावडे , श्रेया शिरसाट, निलेश नाईक , आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा