You are currently viewing गिर्यारोहण-एक साहसी क्रीडाप्रकार

गिर्यारोहण-एक साहसी क्रीडाप्रकार

या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन.

वैभववाडी

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक २३ जुलै रोजी “वनसंवर्धन दिना” निमित्त गिर्यारोहण-एक साहसी क्रीडाप्रकार या विषयावर ऑनलाईन प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेच्यावतीने यापूर्वी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन, सिंधुदुर्ग किल्ला प्लास्टिक मुक्त स्वच्छता कार्यक्रम, पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका व वटपौर्णिमा-एक पर्यावरणीय उत्सव अशा ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. शुक्रवार दिनांक २३ जुलै रोजी वनसंवर्धन दिन आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने ज्येष्ठ गिर्यारोहक, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष तसेच श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक मा‌.उमेश झिरपे यांचे “गिर्यारोहण-एक साहसी क्रीडाप्रकार” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर व्याख्यानाचा लाभ खालील गूगल मीट ॲप लिंकवरून दि‌.२३ जुलै रोजी रात्री ठीक आठ वाजता घेता येईल.
(Please download Google meet app. And click on following link).
https://meet.google.com/gqf-zboa-mew
या व्याख्यानाचा लाभ संस्थेचे पदाधिकारी, दुर्गप्रेमी, गिरिप्रेमी, निसर्गप्रेमी, गिर्यारोहक व तरुण युवक- युवतींनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, सचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील व संस्था सदस्य यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा