You are currently viewing मिरगापासून प्रतिक्षेतील मान्सूनची सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी…

मिरगापासून प्रतिक्षेतील मान्सूनची सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी…

बळीराजाच्या कामांना येणार वेग…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी १५ मे रोजी आलेल्या तौक्ते वादळापासून सुरू झालेला पाऊस त्यानंतर सातत्याने पडत राहिला व मिरगाच्या दिवशी पाऊस येण्याची उत्सुकता असते ती उत्सुकता मात्र गेल्यावर्षी उरली नव्हती. परंतु यावर्षी मिरग जवळ आला तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नव्हती. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असते, यावर्षी ८ जूनला मिरग असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहर वगळता इतर ठिकाणी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता.
शुक्रवारी १० जून पासून बळीराजाची प्रतीक्षा संपून मान्सूनचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार आगमन झालेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शेती-बागायती ने समृद्ध जिल्हा मानला जातो. जिल्हा एका बाजूने सह्याद्रीच्या डोंगर कड्यांनी वेढलेला तर दुसऱ्या बाजूने अरबी समुद्राच्या महाकाय पात्राने घेरलेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कितीही पाऊस पडला तरी डोंगर कड्यावरून वाहून येणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते. परिणामी पुराचे प्रमाण अत्यल्प असते. आजपासून सुरू झालेल्या मान्सूनने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानात घट झालेली असून वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. भविष्यात मान्सून अशीच कृपादृष्टी ठेवेल आणि साऱ्या सृष्टीला न्हाऊ घालून हिरवाई पांघरेल अशी आशा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − six =