You are currently viewing आचरा मधील सुकन्या हुमेरा काझीची महिला प्रीमियर लीगमध्ये दर्जेदार कामगिरी

आचरा मधील सुकन्या हुमेरा काझीची महिला प्रीमियर लीगमध्ये दर्जेदार कामगिरी

मालवण :

 

आचरा मधील सुकन्या हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्स ला विजेते पद मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य करुन आचरा गावचे नाव रोशन केले आहे. ‌तीच्या अभिनंदनाचे पोष्ट सोशल मिडीया वर व्हायरल झाले आणि आचरा काझी वाडीच्या हुमेरा काझी चे सर्वत्र कौतुक होत आहे. हुमेराला गावची ओढ पहिल्या पासूनच होती. तीसरीमध्ये असल्यापासूनच तीला क्रिकेट खेळाची आवड निर्माण झाली होती. गावी आल्यावर मोठ्या टिमबरोबर खेळूनही जिंकत होती. ऑल राउंडर म्हणून तीने आपली ओळख निर्माण केली होती.

या बाबत तिच्याशी फोनवरुन संपर्क साधल्यावर तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दि विषयी माहिती दिली. मुंबई संघातून १६ वर्षाखालील संघातून आपल्या करिअरची सुरुवात झाल्याचे सांगत १९ वर्षाखालील संघात सुरुवातीला तीला सोळावा खेळाडू म्हणून निवड झाली होती. खचून न जाताही संघात संधी मिळताच आपल्या खेळातून संघात स्थान निर्माण केले. त्यानंतर २३ वर्षाखालील संघातून खेळत तीने सिनियर संघात स्थान निर्माण केले. महिला भारतीय संघात, दोनवेळा चॅलेंजर मधून खेळल्याचे तिने सांगितलं. तीच्या खेळाने प्रभावित होत मुंबई इंडियन्स च्या संघमालक नीता अंबानी यांनी तिला मुंबई इंडियन्स मध्ये संधी दिली. संधीचा फायदा उठवित फायनल मध्ये ऍस्मेसला रनाऊट केले होते.

आचरा गावच्या सुपूत्रीची क्रिकेट मधिल एन्ट्री आचरेवासियांसाठी अभिमानास्पद ठरत असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा