You are currently viewing आचरा पशुवैद्यकीय दवाखान्यात कुक्कुटपिल्लांचे वाटप

आचरा पशुवैद्यकीय दवाखान्यात कुक्कुटपिल्लांचे वाटप

मालवण

महिलांना रोजगार मिळून त्यांचे सबलीकरणासाठी व्हावे या हेतूने जिल्हा परिषद शेष फंडातून देण्यात आलेल्या कुक्कुटपिल्रांचे वाटप गुढीपाडव्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. सदर वाटप पशुवैद्यकीय दवाखाना आचरा येथे करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत पशुधन विकास अधिकारी तुषार वेर्लेकर, त्रिंबक सरपंच राजू त्रिंबककर,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, आचरा पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ उमेश पेंडूरकर,परिचर महेश परुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आचरा पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत पाच लाभार्थ्यांना कावेरी जातीच्या पन्नास पिल्लाचे वाटप करण्यात आले. मालवण तालुक्यात एकूण ६६ लाभार्थ्यांना ३८०० पिलांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी वर्लेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + nineteen =