You are currently viewing कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात का घसरले नगराध्यक्ष?

कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात का घसरले नगराध्यक्ष?

सावंतवाडी

बांदा ते दोडामार्ग रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सातत्याने लक्ष वेधूनही या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. ‘कळणे खाण’ प्रकल्पाच्या खनिज वाहू डंपर वाहतुकीमुळे हा मार्ग खड्डेमय बनला.

अपघातास निमंत्रण ठरत असलेल्या या मार्गाचे नूतनीकरण होण्यासाठी बांदा वासियांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर धडक दिली. तब्बल अडीच तास कार्यकारी अभियंता माने, शाखा अभियंता चव्हाण यांना नगराध्यक्षांनी वेठीस धरले. यावेळी त्यांच्यासोबत डी. के. सावंत, बांदा सरपंच अक्रम खान, माजी जिल्हा परिषद सदस्य नाडकर्णी, नगरसेवक मनोज नाईक, बंटी पुरोहित, केतन आजगावकर, लवु भिंगारे,पंचायत समिती सदस्य शितल राऊळ आदी उपस्थित होते

कार्यकारी अभियंता माने यांनी बांदा दोडामार्ग रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तरतूदच नसल्याची कबुली देत, हा मार्ग वाहतुकीला योग्य कधी होणार? याचे समर्पक उत्तर ते देऊ शकले नाहीत.

नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी आमदार ‘दिपक केसरकर’ यांचा एकेरी उल्लेख करत ते निष्क्रिय असल्याचा आरोप केला. पालकमंत्री उदय सामंत यांना जादूगर म्हणत त्यांनाही टिकेचे लक्ष्य बनविले. पुढेही अंगुलीनिर्देश करत ‘दिपक केसरकर तुमचे मित्र आहेत कॉल करून विचारा’ अशीही आगपाखड नगराध्यक्षांनी पत्रकारावर केली.

बांदा दोडामार्ग मार्गाची डागडुजी करण्यासाठी 55 लाखांचा निधी मंजूर झाला. संबंधित ठेकेदार परांजपे यांना कार्यकारी अभियंता यांचा दालनात बोलाविण्याचे फार्मानही सोडण्यात आला. त्यामुळे मलमपट्टी च्या नावाखाली 55 लाखांचा निधी खर्च करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंत्यांच्या दालानातच उघड झाले.

अखेर अडीच तासानंतर चार दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास सोमवारी 19 एप्रिल ला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अक्रम खान यांनी दिल्यावर नगराध्यक्ष कार्यकारी अभियंता यांच्या दालनातून बाहेर पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 3 =