अखेर श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश…

अखेर श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश…

सिंधुदुर्गनगरी
जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्चन्यायालयात अटक पूर्व जामीन अर्जफेटाळल्यानंतर गेले 15 दिवस फरार असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात अखेर सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस ठाण्यात या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कामात असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी विनयभंग केला असल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांच्या वर 22 फेब्रुवारी 2019 रोजी भादवि कलम 354, 354 (1)(i) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा