You are currently viewing पत्नीच्या निधनानंतर आठवडभरात पतीचेही निधन..

पत्नीच्या निधनानंतर आठवडभरात पतीचेही निधन..

सावंतवाडी

लग्नाच्या वेळी जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणा भाका घेतल्या जातात. चराठेतील दाम्पत्याने ही साथ मृत्यूनंतरही निभावली. अवघ्या एका आठवड्यात पत्नी पाठोपाठ पतीचेही निधन झाले. ही दुर्दैवी व धक्कादायक घटना चराठा गावात घडली. या तरुण दांपत्याच्या अकाली निधनाने चराठा गावात शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सेजल गजानन चराठकर (३९) यांचे शुक्रवारी ७ मे रोजी निधन झाले. या धक्क्यातून चराठकर कुटुंबिय सावरत असतानाच गजानन काशिराम चराठकर (४३) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. या दाम्पत्याच्या अकाली व आकस्मिक निधनामुळे चराठकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तर आई वडिलांच्या निधनामुळे दोन मुले मात्र मातापित्याच्या छत्राला पारखे झाले आहेत. नेहमी हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या या दाम्पत्याच्या निघून जाण्याने सर्वांच्याच मनाला चटका लागला असून चराठे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई – सासू ,१० वर्षीय तनिष व तनय हे दोन मुलगे, भाऊ- दिर, भावजय – जाऊ, पुतणी असा परिवार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + nineteen =