You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भाबल यांचे अल्पशा आजाराने निधन

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भाबल यांचे अल्पशा आजाराने निधन

देवगड

तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेचे माजी उपाध्यक्ष, मंगल प्रिंटिंग प्रेसचे मालक चंद्रकांत आप्पाजी भाबल यांचे आज दि.९ जून रोजी राहत्या घरी सानपाडा येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ७३ वर्षांचे होते. भाबल दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांनी तांबळडेग गावच्या सर्व संस्थांसाठी मंगल प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून मोफत छपाई करून संस्थांच्या कार्याला हातभार लावला होता. ते अण्णा भाबल या नावाने सर्वत्र परिचित होते. अतिशय साधी राहणी प्रत्येकाला सहकार्य करण्याची वृत्तीची ही भाबलांची खासियत होती. त्यांच्या निधनाने समाजासाठी, गावासाठी योगदान देणारा सच्चा कार्यकर्ता आपल्यातून गेल्याने संस्थांचे फार मोठे नुकसान झाल्याचे तांबळडेग ग्रामसेवा संस्थेचे अध्यक्ष बाबा मुणगेकर, प्रमोद कांदळगावकर, काका मुणगेकर यांनी सहवेदना व्यक्त करताना सांगितले. भाबल यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, कन्या, भाऊ, भावजय आहेत. कल्याण येथील नगरसेविका माधुरी काळे यांचे काका होते. त्यांच्या मृतदेहावर सानपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा