You are currently viewing डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी

 शेतीला लागणाऱ्या पाण्याची गरज विचारत घेऊन सन 2016-17 पासून अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांसाठी जिल्‍हा परिषदमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी  या योनेचा लाभ  घेण्याचे  आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केल आहे.

             योजनेमध्ये अनुसूचित जाती  व नवबौध्द शेतकऱ्यासाठी नविन विहिरीसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये, जुनी विहीरीसाठी पन्नास हजार रुपये, इनवेल बोअरींगसाठी वीस हजार रुपये  पंपसंच वीस हजार रुपये व वीज जोडणी दहा हजार रुपये  व शेततळे अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये, तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुक्रमे पंचवीस हजार व पन्नास हजार अशी अनुदानाची तरतूद आहे.

        लाभार्थी पात्रतेच्या अटी पूढीलप्रमाणे:- लाभार्थी अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. नविन विहिरीसाठी शेतकऱ्यांकडे त्यांच्या स्वतःचे नावे किमान 0.40 हे. शेतजमिन असली पाहिजे नविन विहिरीव्यतिरिक्त इतर बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान 0.20 हेक्टर जमिन आवश्यक आहे. सामुहिक शेतजमिन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नविन विहिर या घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र असेले. शेतकऱ्याच्या नांवे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.  लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.  लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँकखाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शतकऱ्यांनी तहसिलदार यांच्याकडून सन 2022-2023 चे उत्पन्नाचा दाखला र.रु.1,50,000/- चे मर्यादेत सादर करणे आवश्यक आहे.

 योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmar/login     या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. सर्व शेतकऱ्यांना  त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ऑनलाईन अर्ज भरुन ग्रामसभेच्या शिफारसीने आवश्यक कागदपत्रासह त्यांची प्रत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावयाचा आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे शेतकऱ्यांनी स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर समितीमार्फत मंजूरी देण्यात येणार असून ऑनलाईन लॉटरी पध्दतीने लाभाथ्यर्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अनुदानाची रक्कम थेट हस्तांतरण पध्दतीने लाभार्थ्यांच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यावर जमा करणयात येणार आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या ग्रामसेवकांशी अथवा तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयातील कृषि अधिकारी अथवा जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा