You are currently viewing फोंडाघाटच्या श्री राधाकृष्ण मंदिरात काकड आरतीला प्रारंभ

फोंडाघाटच्या श्री राधाकृष्ण मंदिरात काकड आरतीला प्रारंभ

फोंडाघाटच्या श्री राधाकृष्ण मंदिरात काकड आरतीला प्रारंभ

पहाटे पाच वाजता भक्तिमय वातावरणात आरती; अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केला आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद

फोंडाघाट

फोंडाघाट येथील श्री राधाकृष्ण मंदिरात आजपासून पहाटे पाच वाजता काकड आरतीला प्रारंभ झाला. या भक्तिमय उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांसह बालगोपाळ मंडळाचे सदस्य आवर्जून सहभागी झाले.
काकड आरतीदरम्यान प्रथम उपासना मंत्रांचे पठण करण्यात आले. त्यानंतर विविध आरत्या, ‘घालीन लोटांगण’ आणि मंत्रपुष्पांजलीने धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद आणि केशरी दुधाचे वाटप करण्यात आले.
या काकड आरतीला उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर अजित नाडकर्णी यांनी आपली भावना व्यक्त केली. “एक ते दीड तास ईश्वरचरणी लीन झाल्यानंतर अंतरमन शुद्ध झाल्याची अनुभूती मिळते. अशा उपासनेतून मनाला शांती आणि समाधान लाभते,” असे त्यांनी सांगितले.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिरसात रंगलेल्या या काकड आरतीमुळे श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा