सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात कु.रुची राऊत यांचा उदय…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गावागावात संपर्कामुळे राजकीय चर्चा..

♦मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक युवा चेहरा गावागावात संपर्कात होता, दीपक केसरकर यांच्या विधानसभेच्या प्रचारात देखील सक्रिय होता तो युवा चेहरा म्हणजे खासदार विनायक राऊत यांच्या कन्या कु.रुची राऊत. मागील निवडणुकीपासूनच रुची राऊत यांचा राजकारणात उदय झाला म्हणायला हरकत नाही.

♦कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केसरकर मुंबईत अडकल्यावर मतदारसंघात शिवसेनेचे मोठे नेते फिरकत नसताना कु.रुची राऊत गावागावात पोहोचल्या. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप यानिमित्ताने रुची या गावागावात परिचीत झाल्या. त्यामुळे नवख्या असूनही रुची यांचा चेहरा गावागावात लोकांना ओळखीचा झाला.

♦अलीकडेच सावंतवाडी तालुक्यातील आशाताईंचा मेळावा सावंतवाडीत घेण्यात आला, त्या मेळाव्यात आशाताईंना सुरक्षा किट वाटप करण्यात आलं होतं. या मेळाव्याला जवळपास शंभर टक्के आशाताईंची उपस्थिती होती. या अभूतपूर्व मेळाव्यामुळे त्यांची आशाताईंशी जवळीक झाली. आजपासून सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला असून त्यात आशा ताईंच्या गाववार बैठका आयोजित केल्या आहेत. आशाताईंच्या मुलांच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आशाताईंनी देखील “जिथे तुम्ही आहेत तिथे आम्ही” असा शब्द दिला आहे.

♦महाआघाडी सरकारने देखील कोरोनाच्या काळात उत्तम कार्य केल्याने आशाताईंच्या मानधनात दोन हजार रुपयांची भरघोस वाढ केलेली आहे. त्यामुळे आशाताई शिवसेना पक्षाकडे आशेने पाहत आहेत. परिणामी कु.रुची राऊत या महिलावर्गातही आपले स्थान बनविण्यात यशस्वी झाल्या आहेत.

♦संवाद मीडियाच्या प्रतिनिधीने कु.रुची राऊत यांच्याशी संवाद साधून पुढील विधानसभेसाठी सावंतवाडीतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारल्यावर स्मित हास्य करून त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. शिवसेनेचे खासदार आणि सचिव विनायक राऊत यांच्या कन्या असल्याने भविष्यात सावंतवाडीतून कु.रुची राऊत हा नवा चेहरा निवडणुकीत दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =