आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांची वचनपूर्ती…

आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांची वचनपूर्ती…

सावंतवाडी

नगरपालिका निवडणुकीच्या वेळी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी विकासकामांबाबत दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. सालईवाडा येथील दैवज्ञ मंदीरासमोरील भागात पेवरब्लॉग बसवून देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. दिल्या शब्दाप्रमाणे आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी हायमास्ट टॉवर देखील उभारणार असल्याच त्यांनी स्पष्ट केले आहे. सुधीर आडिवरेकर यांनी दिला शब्द पाळल्याने मतदारसंघातील नागरिकांनी देखील त्यांचे विशेष आभार मानले आहेत. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा