You are currently viewing सावंतवाडी पत्रकार संघाचा २६ मार्चला पुरस्कार वितरण सोहळा…

सावंतवाडी पत्रकार संघाचा २६ मार्चला पुरस्कार वितरण सोहळा…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ‘पुरस्कार वितरण सोहळा’ रविवार २६ मार्चला सकाळी १०.३० वा. कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार संघातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पत्रकारितेत २५ वर्षे व त्याहून अधिक वर्षे करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तर गोव्याचे आमदार जित आरोलकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे शिरोडकर कुटुंबीय पुरस्कृत वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक गांवस, मठकर कुटुंबीय पुरस्कृत माजी आमदार तथा जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू लोंढे, अॅड. अनिल निरवडेकर पुरस्कृत कै. चंदू वाडीकर, आदर्श समाजसेवक पुरस्कार लुमा जाधव, डॉ. अजय स्वार पुरस्कृत जीवनगौरव पुरस्कार रमेश बोंद्रे, हर्षवर्धन धारणकर पुरस्कृत स्व. त्रि. अ. उर्फ बाप्पा धारणकर ,अष्टपैलू स्मृती पुरस्कार परशुराम मांजरेकर यांना ,तर अनिल भिसे कुटुंबीय पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार गणेश हरमलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

याप्रसंगी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक शैलेश परब, तरूण भारत सिंधुदुर्ग आवृत्ती संपादक शेखर सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार परिषद माजी अध्यक्ष गजानन नाईक, डिजिटल मिडीया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, निवड समिती सदस्य हरिश्चंद्र पवार, अवधुत पोईपकर, मोहन जाधव, सचिन रेडकर आदिंची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, सचिव प्रसन्न राणे , खजिनदार रामचंद्र कुडाळकर व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 5 =