You are currently viewing श्री. स्वप्निल वानखडे IAS यांची जबलपूरच्या आयुक्तपदी नेमणूक

श्री. स्वप्निल वानखडे IAS यांची जबलपूरच्या आयुक्तपदी नेमणूक

अमरावती

अमरावतीचे सुपुत्र व स्थानिक मोर्शी रोडवरील अर्जुन नगरात राहणारे श्री.गोपाळराव वानखडे यांचे पुत्र श्री.स्वप्निल वानखडे (आय ए एस) यांची जबलपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे .यापूर्वी ते रीवा येथे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. श्री.स्वप्निल वानखडे हे अमरावतीच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत ,अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे .त्यांचे वडील श्री.गोपाळराव वानखडे हे मोर्शी रोडवरील करजगाव येथे राहणारे असून शिक्षक व शेतकरी आहेत .त्यांच्या मातोश्री ह्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून निवृत्त झाल्या आहेत .श्री स्वप्नील वानखडे हे ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिकलेले असून अनेक वेळा ते शाळेमध्ये पायी गेलेले आहेत .त्यांची पाळेमुळे अमरावतीशी जुळलेली असून आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांनी वेळोवेळी मिशन आयएएस डॉ.पंजाबराव देशमुख आहे एकादमी, बाबूजी देशमुख वाचनालय, युनिक अकादमी यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन अमरावतीच्या मुलांना वेळोवेळी प्रोत्साहित केलेले आहे. मिशन आयएएसने त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी तयार केली असून ती लवकरच लोकाभिमुख करण्यात येणार आहे .एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आयुक्तपदी नियुक्त झाल्याबद्दल मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे सहसंचालक प्रा. प्रवीण खांडवे जनसंपर्क अधिकारी श्री रवींद्र दांडगे तसेच मिशन आयएएसचे मध्यप्रदेशचे संचालक श्री रामकुमार पटेल व सहसंचालक श्री अनिल सिंगोर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये त्यांचे अभिनंदन केले आहे .
प्रकाशनार्थ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा