You are currently viewing तळाशील ग्रामस्थ आज सायंकाळी उपोषण मागे घेणार

तळाशील ग्रामस्थ आज सायंकाळी उपोषण मागे घेणार

ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांना दिली ग्वाही

तळाशील येथे कालपासून सुरु असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाला आमदार वैभव नाईक यांनी आज पुन्हा भेट दिली.आ. वैभव नाईक यांनी तातडीने तळाशील गावात ५४ लाखाचे २ बंधारे मंजूर केले असून उर्वरित बंधाऱ्यासाठी देखील तात्काळ निधी दिला जाणार आहे. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. काही लोकांनी ग्रामस्थांच्या उपोषणामध्ये राजकीय विधाने केली त्याबद्दल आ.वैभव नाईक यांची यावेळी माफी मागण्यात आली. उपोषणातील काही ग्रामस्थ काही कारणास्तव उपस्थित नसल्याने सर्वांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हे उपोषण मागे घेतले जाणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांना दिली आहे.

तळाशील गावचे संजय केळुसकर यांनी ग्रामस्थांना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तळाशील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबाबत व नवीन मंजूर बंधाऱ्यांबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तळाशील गावात ५४ लाखाचे २ बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित बंधारे आमदार फंड व पालकमंत्री यांच्या निधीतून तात्काळ मंजूर करण्यात येतील. तसेच आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून तळाशील गावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.त्यांच्या प्रयत्नांतून तळाशील गावातील तौकते चक्रीवादळामुळे नुकसान ग्रस्त मच्छिमारांना ६४ लाख रु मंजूर झाले आहेत. अशी माहिती ग्रामस्थांना दिली.

 

याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी तळाशील गावातील वाळू उत्खननावर देखील बंदी आणण्यासाठी मुंबईतील मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली. तसेच तळाशील गावात खासदार विनायक राऊत यांना बोलवुन त्यांची ग्रामस्थांशी भेट घालून देण्याचा शब्द त्यांनी दिला.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मच्छिमार नेते बाबी जोगी, सरपंच आबा कांदळकर, संजय केळुसकर, शाखा प्रमुख गजानन तारी, जयहरी कोचरेकर, हर्षल केळुसकर,ताता टिकम, गुरुनाथ पाटकर, केशर जुआटकर, अनिल कांदळकर, समीर लब्दे, नितीन घाडी, समीर घारे, व तळाशीलचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा