You are currently viewing बांद्यात शिवभोजन थाळी सुरू करण्यासाठी साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर यांचा पाठपुरावा

बांद्यात शिवभोजन थाळी सुरू करण्यासाठी साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर यांचा पाठपुरावा

बांद्यात सुरू होणार शिवभोजन थाळी…

शिवसेना शहरप्रमुख साई काणेकर, राजेश विरनोडकर यांची वरिष्ठांकडे मागणी….

बांदा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १ मे पर्यंत लॉक डाऊन जारी केला आहे. हा लॉक डाऊन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे फार मोठे हाल होत आहे. बांद्यात रोजंदारीवर काम करणारे, परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने आहेत. या गरजू लोकांना शिवसेनेच्या शिवभोजन थाळीचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, विभागप्रमुख राजेश विरनोडकर यांनी पालकमंत्री उदय सामंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे बांद्यात शिवभोजन थाळी सुरू करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान याबाबत वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून येत्या काही दिवसात बांद्यात शिवभोजन थाळी केंद्र सुरू होणार असून याचा शेकडो गरजू लोकांना लाभ मिळणार असल्याचे शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − three =