You are currently viewing ….. तर आमदारांना प्रवाशाचे आशीर्वाद मिळाले असते : बनी नाडकर्णी

….. तर आमदारांना प्रवाशाचे आशीर्वाद मिळाले असते : बनी नाडकर्णी

कुडाळ
फटाके, केकवर केलेला खर्च आमदार वैभव नाईक यांनी एसटी स्थानकाच्या परिसरात शेड उभारण्यासाठी केला असता तर नक्कीच उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशाचे आशीर्वाद मिळाले असते असा टोला आम. नाईक व शिवसेनेला मनसेनेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी लगावत मनसेच्या वतीने उभारलेला मंडप काढण्यासाठी राजकीय दबाव एसटी प्रशासनवर आणला जात असल्याचे ही सांगितले.

नव्याने बांधण्यात आलेल्या कुडाळ एसटी स्थानकाच्या ठिकाणी अजूनही शेड उभारण्यात आली नसल्याने प्रवाशांना उन्हाचा, धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अजूनही एसटी प्रशासने काहीच केले नसल्याने प्रवाशांचे उन्हाच्या त्रासापासून संरक्षण हवे, सावली मिळावी याकरिता मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी पुढाकार घेत मनसेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंडप उभारला.

हा मंडप उभारून एक दिवस होत नाही, तोपर्यंत सदरचा मंडप काढण्यात यावा, असे एसटी प्रशासनाने त्यांना कळविले असता याबाबत नाडकर्णी त्यांनी आगार प्रमुख सुजित डोंगरे यांची भेट घेत सांगितले की या ठिकाणी प्रवासी उन्हाने, धुळीने त्रस्त होत आहेत त्यामुळे आम्ही मंडप घातला. सदरचा मंडप काढण्यात यावा याकरिता कोणाचा राजकीय दबाव आला आहे का? ज्यांना मंडप काढायचा आहे त्यांनी अगोदर मंडप किंवा शेडची व्यवस्था करावी. नंतरच मंडप काढण्यात यावा. अन्यथा प्रवासी जनतेला घेऊन घेराव घालणार असा इशारा दिला.

कुडाळ एसटी स्थानकाची जुनी इमारत व्यवस्थित असताना केवळ घड्याळ बसवण्यासाठी कुडाळ एसटी स्थानकाची इमारत तोडण्यात आली. आमदार नाईक यांनी केक व फटाके यांच्यावर केलेला खर्च जर का येथे शेड करण्यासाठी केला असता तर नक्कीच जनतेचे आशीर्वाद मिळाले असते, असा टोला त्यांनी नाईक व शिवसेनेला लगावला. यावेळी डोंगरे यांनी या ठिकाणी शेड मंजूर झाली नाहित असून लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येईल. असे सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =