You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी एकसंध : अनंत पिळणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी एकसंध : अनंत पिळणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी एकसंध : अनंत पिळणकर

कुडाळ

राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी एकसंध आहे. शरद पवार हेच आमचं दैवत आहे. आजच्या उपस्थितीवरून ते दिसून येत आहे. कुणाच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, भीक घालत नाही. पक्ष अजून बळकट करण्यासाठी नव्या दमानं सज्ज झालोत. आमच्या साहेबांवर बोलाल तर याद राखा. ते आमचं दैवत आहेत. साहेबांवर बोलाल तर घरातून बाहेर काढून चोपू असा इशारा अनंत पिळणकर यांनी दिला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा