You are currently viewing वेंगुर्ले पंचायत समिती येथे “डेमो हाऊस” बांधकामाचे सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते भुमीपुजन

वेंगुर्ले पंचायत समिती येथे “डेमो हाऊस” बांधकामाचे सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते भुमीपुजन

वेंगुर्ले

प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामिण) अंतर्गत वेंगुर्ले कॅम्प येथे “डेमो हाऊस” बांधकामाचे भुमीपुजन आज पंचायत समिती सभापती सौ. अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करणेत आले. स्थानिक पातळीवर घरकुल डीझाइनच्या प्रोत्साहनार्थ डेमो हाऊस प्रयत्न म्हणुन करणेत आलेले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थींना घरकुल डीझाईन आकलनासाठी अश्या प्रकारचे डेमो हाऊस तालुकास्तरावर बांधणेबाबत शासनाच्या सुचना आहेत. त्याच अनुषंगाने आज डेमो हाऊस बांधकामाचे भुमीपुजन सभापती अनुश्री कांबळी यांच्या शुभहस्ते करणेत आले.

या कार्यक्रमासाठी उपसभापती सिध्देश परब, गटविकास अधिकारी उमा पाटील-घारगे, पंचायत समिती सदस्य साक्षी कुबल, पशुधन विकास अधिकारी डॉ.देसाई, कोरगांवकर, संतेाष चव्हाण, श्री. जाधव, संजना करंगुटकर यांच्या सहीत पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − nine =