You are currently viewing तळाशील- तोंडवली धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

तळाशील- तोंडवली धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

तळाशील तोंडवली समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरु असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. मोठं मोठे दगड वापरून बंधाऱ्याचे चांगल्या दर्जाचे काम केले जात असून आमदार वैभव नाईक यांनी समाधान व्यक्त केले. तसेच काम लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर कायमस्वरुपी बंधारा होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

आ. वैभव नाईक यांनी खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने तळाशील गावात ५४ लाखाचे दोन धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करून घेतले आहेत. तळाशील गावात बंधारा बांधण्याचा दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण करत बंधाऱ्याचे काम मागील आठवड्यात सुरु करण्यात आले आहे. हे काम प्रगतीपथावर असून कामाची आ.वैभव नाईक यांनी आज पाहणी केली.
याप्रसंगी मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच आबा कांदळकर,राजू परब, गजा तारी, संजय केळुसकर, धर्माजी रेवंडकर, संतोष कांदळगावकर, विवेक रेवंडकर, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा