You are currently viewing राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ८ जुलै रोजी ओरोस येथे बैठक

राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ८ जुलै रोजी ओरोस येथे बैठक

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या २४ जुलै रोजी होऊ घातली आहे. सदरील निवडणुकीसाठी १५ जागांसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. असे असले तरीही यापूर्वी सन २०१५ मध्ये पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री. चंद्रशेखर उपरकर व श्री. सखाराम सपकाळ यांचेसह कांही आजीमाजी संचालकानी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवाराना एकत्र आणून पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करून एक चांगला पायंडा पाडला होता. त्यामुळे पतसंस्थेचा सुमारे ३ ते ४ लाख रुपये खर्च वाचवण्यात यश मिळाले होते. तसेच विद्यमान संचालक व विरोधक यांच्यातील पुढील ५ वर्षातील हेवेदावे दूर करण्यातही यश आले होते.

म्हणून यावर्षी सुद्धा हि निवडणुक न होता ती बिनविरोध व्हावी यासाठी येत्या शुक्रवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता ओरोस येथील राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आलेली असून फक्त उमेदवारानीच बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री. चंद्रशेखर उपरकर व माजी चेअरमन श्री. सखाराम सपकाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 19 =