विकास, विकास आणि विकास…

विकास, विकास आणि विकास…

♦ सगळीकडेच विकास करणार विकास करणार असा मोठा गाजावाजा करत जनतेला खुष करण्यासाठी मोठ मोठी आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात विकास म्हणजे काय? हे किती जणांना समजले आहे?

♦ पर्यटन विकासाचेच घ्या. पर्यटन विकासासाठी MTDC काय करते? सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता तारकर्ली देवबाग पलिकडे जिल्ह्यात पर्यटन आहे हे समजणे महामंडळाच्या कलपने पलिकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माने सारख्या प्रकल्प अधिकाऱ्यांना शासनाच्या मान्यताप्राप्त पर्यटन विकास संस्था आहेत ह्याची माहिती नाही. एकदा तर एका शासकीय कार्यक्रमात शासकीय अधिकाऱ्यांसमोर जाहीर कबुलीच देऊन टाकली. त्यात त्यांची काय चुक म्हणा. वर्तमानपत्र महामंडळाच्या खर्चाने त्यांच्या टेबलावर येतात त्यांना वाचायला वेळ कुठे मिळतो? सगळा वेळ दलाल, ठेकेदार, चमचे, हुजरे यांच्या सहकार्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून शासकीय निधी हडप करण्यात खर्च होतो.

♦ पर्यटन हा व्यवसाय लोकाभिमुख व पर्यटन व्यावसायिकांच्या सहकार्यानेच वृद्धिंगत होउ शकतो हे त्यांच्या बौद्धिक क्षमते पलीकडे आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला त्याला २२ वर्षे झाली परंतु पर्यटन विकास फक्त कागदावर बघायचा व मंत्र्यांच्या भाषणातच ऐकायला मिळतो. हे लोकशाहीतील जनतेचे दुर्दैव. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा पण महामंडळाचे लक्ष तारकर्ली देवबाग वर. का? तर येथे हाऊस बोट, रिसोर्टच्या माध्यमातून लुटमार. विचारणारा कोणीच नाही. हाऊस बोट, व्हाॅल्वो बस, सारंगखेडा, बिल्डरांच्या जाहिरातीसाठी ग्लोबल कोकण, टाईम स्क्वेअर सारखे पर्यटन महोत्सव हे स्वताचे व हितचिंतकांचे खिशे भरण्यासाठीच हे उघड गुपित. यात काय पर्यटन विकास झाला ते जाहीर एकदा कराच.

♦ मोठमोठ्या निधी शिवाय सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून पर्यटन विकास होऊ शकतो हे महामंडळाच्या अधिकाऱ्यांना व नेत्यांना कधी समजणार? असा सवाल पर्यटन प्रेमी डी. के. सावंत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा