You are currently viewing माजी खासदार डॉ.निलेश राणे भाजपचे महाराष्ट्र सचिव

माजी खासदार डॉ.निलेश राणे भाजपचे महाराष्ट्र सचिव

तरुणांमध्ये क्रेझ असलेलं नेतृत्व

संपादकीय…..

सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघाचे माजी खासदार असलेले डॉ. निलेश राणे यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. आपल्या खासदरकीच्या काळात उत्कृष्ठ भाषण शैलीमुळे संसदेत त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने वेळोवेळी आवाज उठवून अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली होती. त्यामुळे सिंधुदूर्गाचा तडफदार तरुण खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
डॉ. निलेश राणे म्हणजे तरुणांमध्ये क्रेझ असलेलं नेतृत्व. स्पष्टवक्तेपणा, उत्तम संभाषण शैली, उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या उत्तम संवाद कौशल्यामुळे त्यांनी मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक मित्रमंडळी जोडून ठेवली. कितीतरी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी त्यांच्याशी मैत्रीच्या नात्यात गुंफले गेले आहेत.
डॉ.निलेश राणे यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावाचा काहींनी फायदा देखील घेतला आहे. निलेश राणेंशी असलेल्या जवळीकीतून अनेकांनी धंदे व्यवसाय उभे केलेत, ऐषाआरामात जीवन जगत आहेत. मोठमोठी पदे देखील मिळवली, करोडोंची संपत्ती उभी केली, उद्योगधंदे उभारले. परंतु ज्यावेळी निलेश राणेंसाठी तन मन धन अर्पून काम करायची वेळ आली तेव्हा मात्र आपल्या हातात कामासाठी आलेले पैसे गच्च करून देखावे केले. अशा काही आपमतलबी कार्यकर्त्यांमुळे निलेश राणे राजकारणात पिछाडीवर पडले. डॉ निलेश राणेंशी एखाद्या कार्यकर्त्यांची ओळख झाली की ते त्यांना नावानेच हाक मारतात, नाव आणि ओळख विसरत नाहीत. दिवसा रात्री अपरात्री देखील कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळेच तरुण कार्यकर्ते आवर्जून त्यांचा दौरा असताना हजर असतात. आमचे साहेब तुम्ही जवळ गेलात तरच समाजातले असे त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आवर्जून सांगतात. परंतु त्यांच्या याच प्रेमळ स्वभावाचा मात्र काहींनी गैरफायदा घेतला.
संसदेत तरुण खासदार म्हणून उत्तम भाषण कौशल्याने त्यांनी आपली छाप सोडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेत त्यांनी ३०१ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आणून दिल्या. त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीवर खुश होऊन भारतीय जनता पार्टी च्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवत त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी त्यांची निवड झाल्याने समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशीच प्रगती करून जिल्ह्याचे नाव रोशन करावे याच संवाद मिडियाकडून डॉ निलेश राणे यांना शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − twelve =