You are currently viewing सागर चव्हाण वाढदिवस अभिष्टचिंतन…

सागर चव्हाण वाढदिवस अभिष्टचिंतन…

संपादकीय…

“सिंधुदुर्ग लाईव्ह” म्हणजे “सागर चव्हाण” हे समीकरणच गेली काही वर्षे जिल्ह्यात तयार झालेले आहे. सिंधुदुर्ग लाईव्ह च्या संपूर्ण प्रवासात सागर चव्हाणचे फार मोठे योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी लाईव्ह बातम्या ही संकल्पना रुजली नव्हती त्यावेळी सिंधुदुर्ग लाईव्ह चा उदय झाला आणि जिल्ह्यातील घडामोडी काहीच क्षणात सोशल मिडीयावर झळकू लागल्या. प्रिंट मीडियामध्ये आजच्या जिल्ह्यातील बातम्या या दुसऱ्या दिवशी वाचायला मिळायच्या, तसेच सोशल मीडियावर देखील बातम्यांच्या चॅनेलचा सुळसुळाट झाला आणि बातम्या कॉपी पेस्ट होऊन आपापल्या नावावर येऊ लागल्या. परंतु यामध्ये बदल घडवताना सागर चव्हाणने सिंधुदुर्ग लाईव्ह च्या माध्यमातून बातम्या वाचायला देतानाच बातम्या सांगायला सुरुवात केली, त्यामुळे अल्पावधीतच सिंधुदुर्ग लाईव्ह ला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला आणि बातम्या ऐकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली.
सिंधुदुर्ग लाईव्हचे टीम वर्क असतं, त्यात संपादक सागर चव्हाण यांचा महत्वाचा रोल आहे. क्षणाक्षणाच्या घडामोडी मग त्या अपघाताच्या असो, मोर्चा, आंदोलने असो वा राजकीय क्षणार्धात लोकांसमोर आणण्यासाठी सागरने आपली फौज तयार ठेवलेलीच असते. अनेक बातमीदार, कॅमेरामन, आदींचा हातभार लागला तरी सागरचे त्यातील योगदान वाखाण्याजोगी आहे. सिंधुदुर्ग लाईव्ह ला एक वेगळी ओळख निर्माण करून देत एका उच्चतम पातळीवर नेण्याचे काम सागर चव्हाणने केले आहे. त्यामुळे सागरने लोकल पत्रकारितेला ग्लोबल करण्याचे काम सागरने केल्याचे सर्वच स्तरावरून बोलले जात आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणजे सागरला मिळालेला पत्रकारितेचा पुरस्कार.
क्राईम रिपोर्टर म्हणून सुरू झालेला सागरचा प्रवास आज कार्यकारी संपादक पदापर्यंत आलेला आहे. सागरने लाईव्ह च्या माध्यमातून सुरू केलेला नवा प्रयोग जिल्ह्यात आपले वेगळे स्थान अबाधित राखून आहे. आपल्या कौशल्याला वाव देताना सागरने सिंधुदुर्ग लाईव्ह हा ब्रँड बनवला त्यामुळे लाईव्ह चालणाऱ्या न्युज चॅनेलवर जाहिरातींचा देखील रतीब वाढत राहिला त्यामुळेच सोशल मीडियामध्ये बातम्या आणि जाहिरातींची स्पर्धा वेगाने वाढू लागली. सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाचे जणू माहेर घरच झालंय, परंतु या सर्वांमध्ये जिल्हाभरातील बातम्या लाईव्ह पाहायला आणि ऐकायला भेटत असल्याने सिंधुदुर्ग लाईव्ह भाव खाऊन गेला आणि याचे सर्वच श्रेय सागर चव्हाण यालाच जाते.
कुठलाही चॅनेल चालवताना आज आलेली बातमी फ्लॅश केली की झळकता येतं, काही दिवस असं घडलं की नावंही होतं, परंतु दुसऱ्या दिवशी काय? हा प्रश्न मात्र मिडियासमोर कायम असतोच. सागरने यातच कमाल दाखवत लोकांना नवनवीन काहीतरी रोजच्या रोज देत लाईव्ह भोवती खिळवत ठेवलं त्यामुळेच आज सिंधुदुर्ग लाईव्ह लोकांना मनात सदैव असतं. जिल्हाभरातील लोकांच्या मनात सिंधुदुर्ग लाईव्ह बातम्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला गुणी पत्रकार सागर चव्हाणचा आज वाढदिवस…..
संवाद मिडियाकडून सागर चव्हाण यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 1 =