You are currently viewing युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांचे निधन

युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांचे निधन

युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांचे निधन;

वयाच्या ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सावंतवाडी :

उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आशिष सुभेदार (वय ३१) यांचे बुधवारी सकाळी आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सावंतवाडीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आशिष सुभेदार यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर गोव्यातील बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी आमदार तथा शिवसेना नेते परशुराम उपरकर यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून आशिष सुभेदार यांची ओळख होती. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासह संघटनात्मक कामातही सक्रिय योगदान दिले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा