You are currently viewing भाजपा सिंधुदुर्ग आयोजित संविधान गौरव अभियानाच्या वस्ती संपर्क मोहीमेत वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी समाजमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित संविधान गौरव अभियानाच्या वस्ती संपर्क मोहीमेत वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी समाजमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन

*भाजपा सिंधुदुर्ग आयोजित संविधान गौरव अभियानाच्या वस्ती संपर्क मोहीमेत वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी समाजमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन.*

वेंगुर्ले

संविधान गौरव अभियान अंतर्गत वेंगुर्ले शहरात आनंदवाडी येथील समाज मंदिरात संविधान पुजन व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी माजी केंद्र प्रमुख आर. के. जाधव व वक्ते बाबुराव खवणेकर सर यांच्या हस्ते संविधान पुजन व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते बाबुराव खवणेकर सर म्हणाले कि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री होते . तसेच एका दलित कायदेमंत्र्याच्या नेतृत्वाखाली संविधान समिती गठीत झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान बनवले गेले . भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत समता, स्वातंत्र्य , बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या शब्दाना खुप महत्व आहे .भारतातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेने जसे संविधानिक मुलभूत अधिकार दिले आहेत , तसेच संविधानिक मुलभूत कर्तव्य देखील जबाबदारीने पार पाडण्यास सांगितले आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा. नगराध्यक्ष राजन गिरप , महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार , बुथप्रमुख विलास कुबल , लाडु जाधव तसेच आनंदवाडीतील महीला व युवक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. सुषमा खानोलकर यांनी केले व आभार प्रदर्शन आर.के.जाधव यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा