You are currently viewing अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हैस गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हैस गंभीर जखमी

कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिजवरील घटना

कणकवली

कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज वर अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हैस गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. फ्लाय ओव्हर ब्रिज वर एस एम हायस्कूल समोर लावलेल्या सिमेंट बॅरिकेट जवळच म्हशीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह पोलीस हवालदार मंगेश बावदाने यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने म्हैशीला जेसीबी द्वारे उचलून जानवली पशुवैद्यकीय दवाखान्यात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + six =