You are currently viewing कणकवली रिंगरोड च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

कणकवली रिंगरोड च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

रिंगरोडमुळे कणकवलीतील ग्रामीण आणि शहर हा भेद नाहीसा होईल

आमदार नितेश राणेंच्या हस्ते रिंगरोड च्या फर्स्ट फेजचे लोकार्पण

कणकवली

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याचा नगरपंचायत निवडणुकीत शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करतोय. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम मेहनत घेत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी रिंगरोड च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणप्रसंगी सांगितले.
आचरा रोड- मसुरकर किनई ते गांगोमंदिर या रिंगरोड च्या पहिल्या टप्प्याचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते नगराध्यक्ष समीर नलावडे, उनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. कणकवली चा ग्रामीण आणि शहर अशी ओळख या रिगरोडमुळे पुसली जाणार आहे. भविष्यात कणकवली ची झपाट्याने विकासाकडे वाटचाल सुरू राहील असा विश्वास आमदार नितेश यांनी व्यक्त केला. यावेळी या रिंगरोडसाठी जागा देणाऱ्या जमीनमालकांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी गटनेता संजय कामतेकर, बांधकाम सभापती मेघा गांगण, नगरसेवक अभि मुसळे, ऍड. विराज भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे,किशोर राणे, अभय राणे, कन्झ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, अनिल शेट्ये, नगरसेविका कविता राणे, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 6 =