You are currently viewing संजय गांधी निराधार योजनेचे आचऱ्यात विशेष शिबीर ; २४० जणांना लाभ

संजय गांधी निराधार योजनेचे आचऱ्यात विशेष शिबीर ; २४० जणांना लाभ

समिती अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती

मालवण

मालवण महसूल प्रशासन आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या वतीने आचरा येथे घेण्यात आलेल्या विशेष शिबिराचा २४० जणांनी लाभ घेतला. याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला विविध दाखल्यांसाठी मालवणात येताना निर्माण होणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या संकल्पनेतून अलीकडेच मालवणातील मामा वरेरकर नाट्यगृहात विविध दाखल्यांसाठी विशेष महाशिबिर घेण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्रामीण भागातही अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आचरा येथील सि रॉक सभागृहात मंगळवारी महसूल प्रशासनाच्या सहकार्याने हे विशेष शिबिर घेण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष मंदार केणी, नायब तहसीलदार श्री. कोकरे, समिती सदस्य अनुष्का गावकर, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, अव्वल कारकून उदय मोंडकर, श्रीमती पाटकर यांच्यासह अन्य सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात हयात दाखले १२४, उत्पन्न दाखले ११२ देण्यात आले. तर संजय गांधी योजनेची नवीन ४ प्रकरणे दाखल करून घेण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 4 =