*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चंद्र उगवला…*
तू चंद्राहून सुंदर
माझ्या आठवणींचे मंदिर
डोहात मनाच्या डोकावून जाय..
चांद उगवला आकाशी बाय..
तुझ्या गालावर शोभते तीट
हरिणाक्षी तू भासते धीट
रथ चंद्राचा घेऊन जाय..
चांद उगवला आकाशी बाय…
तुझे केस ग रेशिम लडी
त्यावर शोभते ग गुलछडी
वारा सुगंध लुटत जाय..
चांद उगवला आकाशी बाय..
चांद पोहतो चांदण्यात
तशी तू ही माझ्या मनात
माझ्या हृदयी अशीच ऱ्हाय
चांद उगवला आकाशी बाय..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
