You are currently viewing विडंबन

विडंबन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी प्रो .डॉ.जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम विडंबनात्मक काव्यरचना*

 

*विडंबन*

 

नाचरे मोरा आंब्याच्या बनात

सर्वेसर्वा पु ल देशपांडे यांची

क्षमा मागून

 

 

नाच रे पोरा

कमळाच्या चिखलात

नाचरे पोरा नाच ।। ध्रु ।।

 

पांढरा पांढरा कापूस

पिंजला रे

खट्याळ वारा झुंजला रे

आत्ता तुझी पाळी

इंद्र देतो टाळी

घड्याळ घेऊन नाच

।। 1 ।।

तिघांचा खेळ रंगला रे

आता उध्दव दमला रे

पोपटाची पंची

आतल्या आत गुच्ची

गप्पगुमान नाच

।। 2 ।।

 

वेडी ईडी नाही रे

सी बी आय छापा नाही रे

मराठी राज्यात

खेळ खेळू तिघात

नाथाच्या मांडी वर नाच

।। 3 ।।

 

धनुष्य आता गिळले रे

घड्याळाची पाळी आली रे

कमळाच्या तळ्यात

चिखलाच्या मळ्यात

घेऊन पिंगा नाच

।। 4 ।।

 

 

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

 

अंकली बेळगाव

कॉपी राईट 10 जुलै 23

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =