You are currently viewing ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या पाहणीसाठी शिक्षणमंत्री दादा भुसे उद्या बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
Oplus_16908288

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या पाहणीसाठी शिक्षणमंत्री दादा भुसे उद्या बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कुडाळ तालुक्यातील पाच शाळांना भेट; विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधून सुविधांचा घेणार आढावा

कुडाळ / प्रतिनिधी : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते कुडाळ तालुक्यातील पाच शाळांना भेट देणार आहेत. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याबरोबरच शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी करून अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत.
मंत्री दादा भुसे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सकाळी ७ वाजता कुडाळ पडतेवाडी येथील पांडुरंगशेट पडते जि.प. प्राथमिक शाळेला भेट देतील. त्यानंतर ८.३० वाजता कुडाळ हायस्कूल, ९ वाजता बॅ. नाथ पै हायस्कूल, कुडाळ, १० वाजता एस. एल. देसाई विद्यालय, पाट आणि ११.३० वाजता जि.प. शाळा, पावशी नं. १ येथे भेट देणार आहेत.

या भेटीदरम्यान विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याबरोबरच शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा मंत्री दादा भुसे घेणार आहेत.
यानंतर दुपारी १ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुनगरी जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा