श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी, आरवली विकास मंडळ व डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
वेंगुर्ला / आरवली : श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली, आरवली विकास मंडळ संचलित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र आणि डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली येथे मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांची नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू संदर्भात आवश्यक तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी आणि व्हिजन आय केअर शिरोडा यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
शिबिराची नोंदणी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी कार्यालय, आरवली तसेच आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, आरवली येथे करण्यात येणार आहे. शिबिराच्या आयोजनासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
नोंदणीसाठी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी कार्यालय, आरवली येथे फोन नं. ०२३६६-२९९८८७, मो. नं. ८३९०३९४४७९ तसेच आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र येथे फोन नं. ०२३६६-२२७२३२, मो. नं. ९८२३४३५५०२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
शिबिराबाबतच्या सूचना व माहिती देवस्थान कार्यालयात पाहावयास मिळतील. तसेच शिबिराबाबतचे सर्वाधिकार आयोजक कमिटी स्वतःकडे राखून ठेवत असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
“तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली, आरवली विकास मंडळ आरवली आणि डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
