सांगेली नवोदय विद्यालयात नववी, अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
रिक्त जागांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत; आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन
सावंतवाडी
शिक्षा मंत्रालय, भारत सरकारद्वारे संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी व अकरावीतील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नवोदय विद्यालय समिती, नोयडा (दिल्ली) यांच्याकडून प्रवेशाबाबत सूचना प्राप्त झाली असून, इयत्ता नववीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9 तर इयत्ता अकरावीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 या संकेतस्थळावर प्रवेशासंदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना पालकांची सही, विद्यार्थ्याची सही आणि विद्यार्थ्याचा फोटो आवश्यक आहे. तसेच खुल्या प्रवर्गाव्यतिरिक्त इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी संबंधित जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाचे नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र काढणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२६ आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच परीक्षाप्रमुख हेमंतकुमार जोंधळे (८०८०२२७३३०) व एस. पी. हिरेमठ (७४४७६०६१४९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
